फोनमध्ये हे Apps असल्यास त्वरित करा डिलीट, बसेल फटका

Mobile Applications

नवी दिल्ली :- अँड्रॉईड डिव्हाईस युजर्सची प्रायव्हसी पुन्हा धोक्यात आली आहे. १० कोटींपेक्षा जास्त अँड्रॉईड स्मार्टफोनवर धोकादायक अ‍ॅप्स इन्स्टॉल झाले होते, त्यातून हॅकर्स युजर्सचा डेटा लीक करताना आढळलेत, अशी माहिती आहे. या धोकादायक अ‍ॅप्सची यादी जाहीर करण्यात आली आहे, यात अनेक पॉप्युलर अ‍ॅप्सचाही समावेश आहे.

Check Point Research ने याबाबत दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, या अ‍ॅप्सच्या मदतीने हॅकर्स अँड्रॉईड डिव्हाईसमधून युजर्सची खासगी माहिती गोळा करतात. लाखो युजर्सचा पर्सनल डेटा रियल टाईम डेटाबेसवर उपलब्ध आहे, जो या अँड्रॉईड अ‍ॅप्सशी लिंक्ड आहे.

हे अ‍ॅप्स अ‍ॅस्ट्रोलॉजी, फॅक्स, टॅक्सी सर्विस आणि स्क्रीन रेकॉर्डिंग कॅटेगरीमधील आहे. यात Astro guru, Logo Maker, T’Leva असे अ‍ॅप्स आहेत. T’Leva हे टॅक्ससंबंधी अ‍ॅप ५० हजारांपेक्षा जास्त वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे.

या अ‍ॅप्समुळे पर्सनल डेटा रिस्कमध्ये असतो. हॅकर्स युजर्सचा ई-मेल, पासवर्ड, नाव, जन्मतारीख, लिंग, डिव्हाईस लोकेशन, प्रायव्हेट चॅट सहजपणे मिळवू शकतात. रिसर्चरला T’Leva अ‍ॅपवर युजर आणि टॅक्सी ड्रायव्हरचे चॅटही अ‍ॅक्सेस करता येत असल्याचे आढळले. हे सर्व अ‍ॅप्स रियल टाईम डेटाबेसशी कनेक्ट आहेत, त्यामुळे हॅकिंगचा धोका जास्त आहे. T’Leva अ‍ॅपच्या डेटाबेसमध्ये केवळ एक रिक्वेस्ट सेंड करून युजर्सची माहिती मिळवता येते.

हॅकर्स या अ‍ॅप्सचे नोटिफिकेशन मॅनेजर अ‍ॅक्सेस करून युजर्सला थर्ड पार्टी अ‍ॅप इन्स्टॉल करण्यासाठी सांगतात. हे नोटिफिकेशन अ‍ॅप डेव्हलपर्सकडूनच आलेलं आहे, असे युजरला वाटते आणि ते अ‍ॅप इन्स्टॉल करतात. त्यामुळे फोनचा डेटा हॅक होतो. जोपर्यंत या अ‍ॅप्सची सिक्योरिटी वाढवली जात नाही, तोपर्यंत हे अ‍ॅप्स फोनमधून त्वरित डिलीट करा, असा सल्ला देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button