
मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर ‘रत्नागिरी राजापूर रिफायनरी’ म्हणजेच ‘नाणार’सारखा प्रकल्प हातातून गमावणे कोकणाला आणि महाराष्ट्राला परवडण्यासारखे नाही, अशी भूमिका मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मांडली आहे. यावर शिवसेनेचे (Shivsena) खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी राज ठाकरे यांना आव्हान दिले की, हिंमत असेल तर नाणारवासीयांसमोर ही भूमिका मांडा.
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत यांनी राज यांना टोमणा मारला – राज ठाकरे यांनी कोकणात येऊन नाणार प्रकल्प येऊ देणार नाही, अशी घोषणा केली होती. आता त्यांचे मतपरिवर्तन कशासाठी झाले, हे माहीत नाही. २२१ गुजराती लोकांनी जमिनी खरेदी केल्या त्यांच्या भल्यासाठी ही भूमिका घेतली आहे का?
नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा प्रचंड विरोध आहे. विरोध करणारे हजारो लोक आहेत. हिंमत असेल तर राज ठाकरे यांनी त्यांची ही भूमिका जनतेसमोर जाऊन मांडावी. नाणार प्रकल्प महाराष्ट्रातच राहणार आहे. राज्याच्या बाहेर जाणार नाही. त्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. मात्र, हा प्रकल्प नाणारला राहणार नाही, हे निश्चित आहे, असे विनायक राऊत म्हणाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला