हिंमत असेल तर पोलिसांत जा; सोमय्यांचे राऊतांना आव्हान

Kirit Somaiya-Sanjay Raut

मुंबई : ‘धमकीची भाषा वापरणे हे शिवसेनेला जमते. हिंमत असेल तर माझ्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये जा, ही माझी वॉर्निंग आहे.’ या शब्दांत  भाजपाचे नेते किरीट सोमय्या (Bjp Leader kirit somaiya) यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना आव्हान दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आर्थिक व्यवहाराबद्दल उत्तर द्या, असेही आव्हान दिले. पत्रकार परिषदेत सोमय्या म्हणाले – ‘या सरकारच्या वर्षपूर्तीआधी आणखी तीन घोटाळे बाहेर काढणार आहे. याचा तपास लोकायुक्तांनी करावा, असे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत. यावर संजय राऊत आणि शिवसेना नेते का बोलत नाहीत? धमकी देण्याची भाषा संजय राऊतांची आहे. आम्ही त्या भाषेत बोलणार नाहीत. राऊतांमध्ये हिंमत असेल तर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करावी, माझ्यावर कारवाई करुन दाखवा. ३० सातबाऱ्यांवर अन्वय नाईक परिवार आणि रश्मी ठाकरे यांचे एकत्रित नाव आहे.

मूळ मुद्द्यांवरून लक्ष्य वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. नाईक, वायकर आणि ठाकरे परिवारात काय आर्थिक लागेबांधे आहेत? उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आर्थिक व्यवहार केले आहेत, त्याची उत्तरं द्यावीत, असे सोमय्या म्हणाले.

ठाकरे व मुंबईच्या महापौरांवर आरोप

दरम्यान, मुंबईत गरीब झोपडपट्टीवासीयांसाठी बांधण्यात आलेले अर्धा डझनाहून अधिक गाळे अपारदर्शकरीत्या महापौर यांनी स्वत:च्या परिवाराच्या ताब्यात ठेवले आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. याबाबत सर्व पुरावे याचिकेत दिले आहेत, असे ते म्हणालेत. ठाकरे सरकारकडे सतत पाठपुरावा केल्यानंतरही एसआरए, मुंबई पोलिसांनी महापौरांवर कारवाई केली नाही. महापौरांनी बनावट सही करत करार केला.

कागदपत्रं पोलीस ठाण्यात सादर करून तक्रार केल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काहीही कारवाई केली नाही. मुंबई उच्च न्यायालयात किशोरी पेडणेकर, ठाकरे सरकार, मुंबई महापालिका आणि एसआरएच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. अशी माहिती किरीट सोमय्या यांनी यावेळी दिली. दिवाळीनंतर यावर सुनावणी होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER