हिंमत असेल तर गुजरातमधून निवडणूक लढा… स्मृती इराणींचे राहुल गांधींना खुले आव्हान

Smriti Irani - Rahul Gandhi

वांसदा (गुजरात) : आसाममध्ये जाहीर सभेत बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) नेहमीप्रमाणे घसरले आणि म्हणाले – गुजरातमधील चहावाल्यांच्या खिशातून पैसे काढणार आहे. यावर राहुल गांधी यांना  उत्तर देताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) म्हणाल्यात – मी राहुल गांधींना खुले आव्हान देते, हिंमत असेल तर गुजरातमधून निवडणूक लढा; तुमचे सर्व गैरसमज दूर होतील.

केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार स्मृती इराणी जाहीर सभेत म्हणाल्यात, गुजरातच्या लोकांविषयी कॉंग्रेसचे धोरण नेहमीच पक्षपाती राहिले आहे. राहुल गांधी आणि कॉंग्रेसने गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेलांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’लासुद्धा विरोध केला होता.

आसाममध्ये एका रॅलीत राहुल गांधी यांनी गुजरातमधील चहावाल्यांच्या खिशातून पैसे काढणार, असे वक्‍तव्य केले होते. काँग्रेसला आतापर्यंत चायवाला (पंतप्रधान नरेंद्र मोदी) विषयी तिटकारा होता.  आता त्यांना चहा पिणाऱ्यांविषयीही तिटकारा निर्माण झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER