हिंमत असेल तर अमेय खोपकरला अटक करून दाखवा ; मनसेचा आक्रमक पवित्रा

मुंबई: मराठी भाषा दिनानिमित्ताने (Marathi Language Day) मनसेचे (MNS) चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्कात ‘मराठी स्वाक्षरी’ मोहीम आयोजित केली होती. त्याला शिवाजी पार्क पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तर खोपकर यांनी कोणत्याही परिस्थितीत कार्यक्रम करणारच असा पवित्रा घेतला आहे. पोलिसांनी खोपकर यांना नोटीस बजावल्याने मनसेही आक्रमक झाली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे  (Sandeep Deshpande) यांनी तर हिंमत असेल तर अमेय खोपकरला अटक करून दाखवाच, असा इशाराच दिला आहे.

ही बातमी पण वाचा:- कार्यक्रम होणारच, तुम्हाला हवी ती कारवाई करा ;  मनसेचे  जाहीर आव्हान! 

देशपांडे यांनी ट्विट करून हा इशारा दिला आहे. हिंमत असेल तर अमेय खोपकर यांना अटक करून दाखवाच असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तर अमेय खोपकर यांनीही ट्विट करून पोलिसांच्या आलेल्या नोटीसवर संताप व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER