‘बोलण्यासारखे काही नसेल तर तोंड बंद ठेवा!’ ट्रम्प यांना पोलीस अधिकाऱ्याचा सल्ला

keep your mouth shut Police officer's advice to Trump

ह्युस्टन : आफ्रिकन वंशीय जॉर्ज फ्लाइड याचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेत उसळलेल्या हिंसक निदर्शनांच्या संदर्भात ह्युस्टन पोलीस प्रमुख आर्ट असीवेदो यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना सल्ला दिला आहे की – तुमच्याकडे बोलण्यासारखं काही नसेल, तर तोंड बंद ठेवा.

जॉर्ज फ्लाइडचा अमेरिकेतील मिनियापोलीस शहरात पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाल्यानंतर अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने सुरू आहेत. ही निदर्शने कठोरतेने हाताळा, असे निर्देश अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्याने निदर्शक जास्त चिडलेत. स्थिती आणखी चिघळली. निदर्शने कठोरतेने हाताळा, असे निर्देश देताना डोनाल्ड ट्रम्प टेक्सॉस प्रातांतील मिनियापोलीस शहराच्या गव्हर्नरशी बोलताना म्हणाले होते की – बळाचा वापर करून हिंसाचार शांत करा. तुम्ही निदर्शकांवर, आंदोलकांवर वर्चस्व मिळावायला हवे.

तुम्ही असे करत नसाल, तर तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहात. ते तुमच्यावर धावून येणार आहेत. त्यामुळे तुम्ही वर्चस्व प्रस्थापित करायला हवे. मिनियापोलीसमधील राष्ट्रीय सुरक्षा दलाचे कौतुक करताना ट्रम्प म्हणाले होते की, त्यांनी आंदोलकांना पावाच्या एखाद्या तुकड्यासारखे चिरडून टाकले होते. या निदर्शनांच्या संदर्भात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ह्युस्टनचे पोलीस प्रमुख आर्ट असीवेदो यांनी ट्रम्प यांना गप्प बसण्याचा सल्ला दिला.

असीवेदो म्हणाले, देशातील पोलीस प्रमुखांच्यावतीने मला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सांगायचे आहे की, तुमच्याकडे बोलण्यासारखे काही नसेल, तर तोंड बंद ठेवा. ही वेळ वर्चस्व स्थापन करण्याची नाही, लोकांचे अंतःकरण आणि मन जिंकण्याची आहे. मी हे ठामपणे सांगतोय की, दयाळूपणाला आम्ही कमकुवतपणा म्हणणार नाही. आम्ही जनजीवन पूर्वपदावर आणले आहे. खराब करू इच्छित नाही.

असीवेदो यांनी या संदर्भात हॉलिवूडपटातील एका संवादाचा उल्लेख करत ट्रम्प यांना सल्ला दिला. “तुमच्याकडं बोलण्यासारखं काहीच नसेल, तर तोंड बंद ठेवा. कारण हेच नेतृत्वाचं मुख्य तत्त्व आहे. आम्हाला आताच्या नाहीतर पूर्वीच्या नेतृत्वाची गरज आहे. हा हॉलिवूडचा सिनेमा नाही. वास्तविक जीवन आहे व वास्तविक जीवनाता जोखीम आहे. मिनियापोलीस शहरात जॉर्ज फ्लॉइड याचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. त्याला अटक करताना पोलीस अधिकाऱ्याने त्याची मान गुडघ्याखाली दाबून ठेवली होती. यामुळे श्वास कोंडल्याने जॉर्जचा जीव गेला. या घटनेचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेत हिंसाचाराचा उद्रेक झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER