माझ्याजागी तुमची मुलगी असती तर ?, कंगनाचा जया बच्चन यांना बोचरा प्रश्न

Kangana Ranaut & jaya Bachaan

चंदीगड : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यूप्रकरणानंतर सुरू असलेल्या, चित्रपटसृष्टी आणि अमलीपदार्थ विषयावर बोलताना अभिनेत्री व खासदार ज्या बच्चन यांनी अभिनेत्री कंगना रणावतवर (Kangana Ranaut) टीका केली. यांवर कंगनाने ज्या बच्चन यांना बोचरा प्रश्न विचारला माझ्याजागी तुमची मुलगी असती तरीही तुम्ही असेच म्हणाल्या असत्या?

राजसभेत शून्य प्रहरात बॉलिवूड इंडस्ट्रीचा मुद्दा मांडण्यात आला. ज्या बच्चन म्हणाल्या – बॉलिवूड इंडस्ट्रीला काही लोकं बदनाम करत आहेत. मनोरंजन विश्वातील लोकांना सोशल मीडियावर वाटेल ते बोलले जाते. ज्यांनी इंडस्ट्रीत राहून नाव कमावलं, तेच आता इंडस्ट्रीला गटार म्हणतायत. माझा याला पूर्ण विरोध आहे. लोकांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये असे सरकारकडून सांगण्यात यावे अशी मी आशा करते. इंडस्ट्रीने नेहमीच चांगल्या उपक्रमांसाठी सरकारला मदत करायला पुढाकार घेतला आहे. आता सरकारने इंडस्ट्रीला पाठिंबा द्यावा. यात कंगनालाही टोमणा होता.

यावर कंगनाने ट्विट करून जया बच्चन याना प्रश्न विचारला – जयाजी, माझ्या जागी तुमच्या मुलीला श्वेताला जर किशोरवयात कोणी मारहाण केली असती, तिला ड्रग्स दिले असते आणि तिच्यासोबत गैरवर्तणूक केली असती, तर तेव्हादेखील तुम्ही असंच म्हणाला असतात का? तसंच अभिषेक सातत्याने छळ व गुंडगिरीचा त्रास होतोय अशी तक्रार करत असेल आणि एक दिवस तो अचानक फासावर लटक्याचं दिसून आला तर ? आमच्यासाठी सुद्धा कधीतरी प्रेमाने हात जोडण्याचा प्रयत्न करा. ट्विट सोबत कंगनाने जया बच्चन यांचा सभागृहातील व्हिडीओदेखील शेअर केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER