‘मत दिले नाही तर पाणी-वीज तोडू !’ तृणमूलच्या नेत्याची धमकी

If you don't vote, water - cut off electricity! Trinamool leader threatens

हुगळी : बंगालमध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा हिंसाचार ही सामान्य गोष्ट झाली आहे. आता विधानसभेची निवडणूक घोषित झाल्यानंतर प्रचार सभांमध्ये तृणमूलचे  नेते मतदारांना धमक्या देत आहेत. कृषिमंत्री तपन दासगुप्ता (Tapan Dasgupta) यांनी निवडणुकीत मते न मिळाल्यास मतदारांना भयंकर परिणामांची धमकी दिली.

हुगळी येथील एका प्रचार सभेत तपन दासगुप्ता म्हणालेत, ज्या भागात मला मत मिळणार नाहीत, त्या भागातील लोकांना वीज आणि पाणी मिळणार नाही! विधानसभा निवडणुकीत पक्षाला मत न दिल्यास मतदारांना धमकी देण्याची तृणमूल कॉंग्रेसच्या उमेदवाराची ही पहिलीच वेळ नाही. टीएमसीचे आमदार हमीदुल रहमान पश्चिम बंगालमधील मतदारांना धमकावताना पकडले गेले होते.

‘विश्वासघात’ करणाऱ्यांवर निवडणुकीनंतर कारवाई करू, अशी धमकी हमीदुल रहमान यांनी दीनजपूर येथे जाहीर सभेत दिली होती. हमीदुल रहमान म्हणाले होते की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारी फायद्यांचा आनंद लुटल्यानंतरही ‘विश्वासघात’ करणारे लोक ‘देशद्रोही’ गणले जातील!

ही बातमी पण वाचा : … म्हणून नेते तृणमूल सोडत आहेत, ममतांची साथ सोडणाऱ्या आमदाराने सांगितले कारण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER