… तर सर्वांनी राजीनामे द्या; अजित पवार संतापले

ajit-pawar-1574499305

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बारामती नगरपालिकेच्या नगरसेवकांची बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी नगरसेवक एकमेकांबद्दल तक्रारीचा पाढा वाचत होते. काही क्षणी नगरसेवकांच्या या शाब्दीक युद्धात अजितदादांनी हस्तक्षेप केला. सर्व नगरसेवकांनी एकदिलाने काम करा नाहीतर राजीनामे देऊन घरी जा, मी प्रशासक आणून विकासकामे करुन घेतो, असा आक्रमक पवित्रा घेतल्याने सर्व नगरसेवक शांत झाले . त्याचसोबत सत्ता आल्यानंतर शहराचा विकास करायचा की तुमच्यातील वाद मिटवायचे असा प्रतिसवालही नगरसेवकांना केला.

आमच्या विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधातील पुरावे पक्षाकडे सुपूर्द : एकनाथ खडसे

दरम्यान अजित पवार तडकाफडकी निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेससोबतच पवार कुटुंबात मोठी फूट पडल्याची चित्र निर्माण झालं होतं. अजित पवारांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली होती. त्यानंतर केवळ काही तासांतच हे सत्तानाटय़ संपुष्टात आले आणि भाजपचे स्वप्न दुभंगले.