अमोल कोल्हेंच्या बाजूने आमदार अमोल मिटकरी पुढे सरसावले, दिला हा इशारा

Amol Kolhe & Mitakri

मुंबई : सोशल मीडियावर अक्षय बोऱ्हाडे नामक एका तरुणाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये या तरुणाने दावा केला आहे की, शिवऋण प्रतिष्ठानच्या माध्यमातून बेघर, निराधार लोकांची सेवा करत असल्याने जुन्नरमधील बड्या राजकीय नेत्याकडून आपणास मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शिरुर मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपलं मत व्यक्त करताना, नाण्याची दुसरी बाजू तपासणेही गरजेचं असल्याचं म्हटले होते. त्यानंतर, सोशल मीडियातून आणि काही शिवभक्तांकडून अमोल कोल्हे यांच्यावर टीका करण्यात आली. आता, कोल्हेंवरील या टीकेला पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तरदेत त्यांच्या बाजूने सरसावले आहेत.

शिखंडीच्या आडून बाण मारू पाहणाऱ्यांनी एक कायम लक्षात घ्यावे राष्ट्रवादीपक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हेजी महाराष्ट्रातील तमाम तरुणाईच्या गळ्यातील ताईत आहेत. त्यांना चुकीच्या पद्धतीने बदनाम कराल तर भविष्यात फक्त जप करत बसावं लागेल, असे म्हणत अमोल मिटकरी यांनी खासदार अमोल कोल्हेंची बदनामी करणाऱ्यांना, त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना ट्विटरच्या माध्यमातून लक्ष्य केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER