टीका करता तर टीका सहन करण्याची ताकद ठेवा; वडेट्टीवारांचा चंद्रकांत पाटील यांना टोला

Chandrakant Patil - Vijay Wadettiwar

मुंबई : एक्झिट पोलचे सर्व अंदाज खोटे ठरवत बंगाली जनतेने तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) आणि ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना पाठिंबा देत सरकार स्थापन करण्याची संधी दिली. त्यामुळे सत्तांतराचा भाजपचा अपेक्षाभंग झाला आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप (BJP) नेत्यांनी २२० पारचा नारा दिला होता. त्यावरून काँग्रेस (Congress) नेते, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना जोरदार टोला हाणला.

बंगाल निवडणुकीतील पराभवानंतर चंद्रकांत पाटील भांबावले आहेत. टीका करण्याची आवड असेल तर टीका सहन करण्याचीही ताकद असायला हवी, असा टोला वडेट्टीवारांनी पाटलांना लगावला. निवडणुकांचं  योग्य प्रकारे नियोजन केलं असतं तर देशात कोरोनाचा उद्रेक वाढला नसता. पाच  राज्यांच्या निवडणुकीत विजय मिळवण्याच्या नादात देशात गंभीर परिस्थिती निर्माण केली. महाराष्ट्रानं कोरोना रुग्णांची संख्या लपवली नाही. इतर राज्यांमध्ये आकडे लपवले जात आहेत. राज्य सरकारने साडेसहा हजार कोटी रुपये कोरोना लस आणि ऑक्सिजन खरेदीसाठी राखून ठेवले आहेत. आता केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयाला किती मानतं हे बघावं लागेल.

लाखोंच्या संख्येनं रुग्ण मिळत असूनही लॉकडाऊन का घोषित केला जात नाही? असा प्रश्नही वडेट्टीवार यांनी केंद्राकडे उपस्थित केला. केंद्र सरकारचं लसीकरणाचं नियोजन पूर्णतः बिघडलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात केंद्राला खडे बोल सुनावले आहे. सामूहिक जबाबदारीने संकटावर मात करण्याची तयारी न दाखवता केवळ घोषणा केली जाते. नागपुरात कोरोनाचे पाच  स्ट्रेन पाहायला मिळाले आहेत. आदर पूनावाला प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. आशिष शेलार यांनी आदर पूनावाला यांना कुणी धमकावलं याचा भांडाफोड करावाच, असं आव्हानही वडेट्टीवार यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button