दंगेखोरांवर नियंत्रण मिळवता येत नसेल तर सत्तेतून पायउतार व्हा : दिल्ली हिंचाचारावरून रजनीकांतची टीका

Rajnikant - Delhi Violence

चेन्नई : दिल्लीत ज्या पद्धतीने हिंसाचार उसळला तो अतिशय दुख:द आहे. ज्या पद्धतीने हिंसक परिस्थीती निवळायला वेळ लागली ते पाहाता हे केंद्र सरकारच्या गुप्तचार विभागाच आणि गृहमंत्रालयाचे अपयश असल्याचे दक्षिणात्य सुपरस्टार रजनिकांत यांनी म्हटले आहे. जर तुम्हाला दंगेखोरांवर नियंत्रण मिळवता येत नसेल तर सत्तेतून पायउतार व्हा, असे रजनीकांत यांनी थेट आव्हानच दिले आहे. परंतु त्यांनी कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही. दिल्लीतल्या हिंसाचारावरून त्यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.

दिल्ली हिंसाचारातील मृतांचा आकडा २५ वर, १८ जणांवर गुन्हे, १०६ जणांना अटक

यापूर्वी सुद्धा रजनिकांत यांनी सीएए आणि एनआरसी च्या मुद्यावर केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतली होती. एक प्रकारे मुस्लीम धर्मियांचा जो विरोध या दोन्ही विधेयकांना होत आहे त्याचीच बाजू रजनिकांत यांनी घेतली होती. दिल्लीतले आदोलन शांततेत होऊ शकले असते. पण तसे झाले नाही. जर कोणीही हिंसाचार करत असेल तर त्याचा कठोरपणे मुकाबला केला पाहीजे असेही थलायवा अर्थात सुपरस्टार रजनिकांत ने म्हटले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याचा हवाला देत रजनीकांत म्हणाले, जेव्हा ट्रम्प भारताच्या दौऱ्यावर आले होते, तेव्हा केंद्राने सावधानता बाळगण्याची गरज होती. आयबीने आपले काम नीट केले नाही. हिंसा पसरवण्यांविरोधात कडक कारवाई केली पाहिजे होती. आता तरी आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही सावधान व्हाल, असे म्हणत मोदी सरकारवर निशाणा साधला. विरोध प्रदर्शन करणाऱ्यांनी हिंसक होण्याची आवश्यकता नाही. जर सीएएने खरंच मुस्लिमांचे नुकसान होणार असल्यास मी त्यांच्यासोबत असल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला आहे.