तुम्ही नियम मोडले तर, … खेड प्रकरणावरून संजय राऊतांचा राष्ट्रवादीला पुन्हा इशारा

Ajit Pawar - Sanjay Raut

पुणे : खेड येथे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उडालेल्या खटक्याबाबत शिवसेनेचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रपरिषदेत पुन्हा राष्ट्रवादीला पुन्हा इशारा दिला – आम्ही नियम, मर्यादा, लक्ष्मणरेषा पाळतो. पण तुम्ही नियम मोडत असाल, तर आम्हाला देखील तो अधिकार आहे.

काल (शनिवारी) संजय राऊत यांनी खेडमधील घडामोडींवरून राष्ट्रवादी काँग्रेसला सूचक इशारा दिला होता. या जिल्ह्याचे या भागाचे महत्वाचे नेते म्हणून आमची अशी अपेक्षा आहे की अजित पवार (Ajit Pawar) यांनी यामध्ये लक्ष घालायला हवं, असे म्हणाले होते.

शिवसेनेचे सदस्य पळवलेत

खेडमधले शिवसेनेचे सदस्य पळवण्यात आले, असा दावा यावेळी संजय राऊत यांनी केला. ते म्हणालेत, हा विषय खेडपुरता मर्यादित आहे. खेडमधले आमचे सदस्य पळवण्यात आले. त्यांना आमिष दाखवण्यात आली. दहशत निर्माण करण्यात आली.

खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला. त्यानंतर पोखरकरांविरोधात बंड करणारे काही सदस्य सहलीवर गेले. या सदस्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांची फूस आहे, असा शिवसेनेचा आरोप आहे. मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे.

हा वाद स्थानिक पातळीवर सुरू असून याचा वरीष्ठ नेत्यांशी संबंध नाही, असे राऊत म्हणालेत. तीन पक्षांनी एकत्र बसून घ्यायचा हा निर्णय आहे. महाविकासआघाडीमघ्ये कोणतेही भांडण नाही. या प्रकाराशी अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे किंवा शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांशीही याचा काही संबंध नाही. हे स्थानिक पातळीवरचे आमदार किंवा अन्य लोकांनी घडवून आणले आहे. असे प्रकार घडू नयेत ही शिवसेनेची भूमिका आहे. आपण महाविकासआघाडीमध्ये आहोत. दुसऱ्या पक्षाच्या नगरसेवकांविषयी काही निर्णय घेताना त्या पक्षाच्या प्रमुख लोकांशी चर्चा केली पाहिजे. जर तुम्ही तो नियम तोडत असाल, तर तो अधिकार आम्हालाही आहे. आम्ही नियम पाळतो. आम्ही या लक्ष्मणरेषा आणि मर्यादा पाळतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button