गावात दमबाजी केल्यास गाठ माझ्याशी; राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कुणाला भरला दम?

Rohit Pawar

मुंबई :- ग्रामपंचायत निवडणूक (Gram Panchayat) बिनविरोध करण्यासाठी गावांना बक्षीस म्हणून निधी देण्याच्या योजनेत कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही पुढाकार घेतला आहे.

निवडणूक बिनविरोध करणाऱ्या गावाला ३० लाखांचा निधी देण्याची घोषणा करतानाच निवडणुकीत दडपशाही आणि दमबाजी करणाऱ्यांनाही त्यांनी तंबी दिली आहे. कोणी असे प्रकार केले तर गाठ माझ्याशी आहे, इशाराच पवार यांनी दिला आहे.

कर्जत तालुक्यातील ५६ तर जामखेड तालुक्यातील ४९ गावांच्या ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यातील बिनविरोध निवडणूक होणाऱ्या गावांना आमदार निधीतून, सीएसआर फंडातून ३० लाखांचा विकास निधी देण्याची घोषणा पवार यांनी केली आहे.

पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी घोषणा केल्यानंतर अल्पावधितच राज्यातील विविध पक्षांच्या आमदारांनी आपापल्या भागात अशी घोषणा केली. त्यानुसार अनेक ठिकाणी निवडणुका बिनविरोध होत आहेत. संवेदनशील आमदार म्हणून ओळख असलेल्या रोहित पवार यांनीही अशी घोषणा करण्याची मागणी त्यांच्या मतदारसंघातून होत होती. बहुतांश उमेदवारांचे अर्ज भरून झालेले असताना आणि शेवटचे दोनच दिवस बाकी असताना पवार यांनी अखेर ही घोषणा केली. त्यामुळे ज्या गावांना निवडणूक बिनविरोध करायची आहे, त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी करावी लागणार आहे.

ही बातमी पण वाचा : अजित पवार-देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात गोंधळ; भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER