कोरोनाच्या आड अधिवेशन टाळणार असाल तर जनता …, पडळकरांचा मुख्यमंत्र्याना इशारा

Uddhav Thackeray & GopichandPadalkar

सिंधुदुर्ग : कोरोना (Corona) वाढला आहे, असे सांगून विधिमंडळाचे अधिवेशन टाळत असाल तर जनता पाहते आहे, ती तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा भाजपाचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padlkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) याना दिला.

पडळकर म्हणाले की, ठाकरे सरकारला कुठल्याच परिस्थितीचे गांभीर्य नाही. कोरोना काळात लॉकडाऊन (Lockdown) झाले आणि त्यानंतर लॉकडाऊन उघडल्यानंतरही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला १०० हून अधिक पत्र पाठवले, त्यात कोरोना चाचणी थांबवू नका, जास्तीत वाढवा असे म्हटले होते, तेव्हा सरकारने कानाडोळा केला, ऐकले नाही.

आता १ मार्चला अधिवेशन आहे म्हटल्यावर पुन्हा संचारबंदी, कोरोना, कलम १४४, लॉकडाऊन करणार असे प्रयोग सुरू झाले आहेत. लॉकडाऊन करणार त्याआधी गोरगरिबांची व्यवस्था करा. तुम्ही लॉकडाऊन करणार आणि घरात बसणार. पण, खेड्यापाड्यातील जनता गरीब आहे, त्यांची चुल पेटणार कशी? केंद्र सरकारने लॉकडाऊनकाळात अनेकांना मदत केली परंतु राज्य सरकारने एकतरी योजना दाखवावी ज्याच्यामुळे जनतेला मदत मिळाली, असे आव्हान पडळकरांनी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER