महिला पोलीस सुरक्षित नाही, तर सामान्यांचं कसं होणार? चित्रा वाघ यांची गृहमंत्र्यांना विचारणा

Chitra Wagh - Dilip Walse Patil

मुंबई : महाराष्ट्रात लहान मुली, महिलांसोबतचं पोलीस विभागात काम करणाऱ्या महिला पोलीसही लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरत आहेत. ही गंभीर आणि तितकीच चिंतेची बाब आहे. त्यामुळे या प्रकरणात स्वत: लक्ष घालून खाकीवर डाग असणाऱ्या विकृतांना तात्काळ अद्दल घडवा, अशी मागणी भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना केली आहे. केलं आहे. चित्रा वाघ यांनी आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. तसेच राज्यातील जनतेची सुरक्षा करणाऱ्या पोलीस दलातील महिलाच जर बलात्काराच्या बळी ठरत असतील तर सर्वसामान्यांचं काय होणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

चित्रा वाघ यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेत राज्यातील वाढत्या महिला अत्याचारावर चर्चा करून त्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचं आवाहन केलं. तसेच महिला अत्याचार रोखण्यासंदर्भात निवेदनही दिलं. राज्यात या घटना कुठे ना कुठे होतच आहेत. राज्यातील जनतेची सुरक्षा करणाऱ्या पोलीस दलातील महिलाच जर बलात्काराच्या बळी पडत असतील तर सर्वसामान्यांचं काय होणार? असा सवाल त्यांनी केला. महिला पोलीसच सुरक्षित नसतील तर आमचं रक्षण कसं होणार? असा सवाल करतानाच तुम्ही या प्रश्नात लक्ष घालून खाकीवर डाग असणाऱ्या विकृतांना धडा शिकवा. राज्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घ्या, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. राज्यात मुली आणि महिलांवर अत्याचार होत असतानाच आता पोलीस दलातील महिलाही अत्याचाराच्या बळी पडत आहेत. लैंगिक अत्याचार पीडितांना आपली व्यथा मोकळेपणाने मांडता यावी म्हणून तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पोलीस दलात महिलांचा समावेश केला. त्यांचा हा निर्णय कितपत यशस्वी झाला आहे?, असा सवाल वाघ यांनी निवेदनात केला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button