आम्ही ‘चंपा’ बोललो तर तुमचं मानसिक संतुलन ढासळतं ; अमोल मिटकरींचा चंद्रकांत पाटलांना टोला

Amol Mitkari-Chandrakant Patil

मुंबई : भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर सडकून टीका केली. याला आता राष्ट्रवादीचे (NCP) नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

चंद्रकांत पाटलांनी कुंभकर्णासारखं बरळू नये. आम्ही चंपा बोललो तर तुमचं मानसिक संतुलन ढासळतं. अजितदादा किती तास झोपतात आणि जागतात हे संपूर्ण राज्याला माहिती आहे. उगाच उंटाच्या तोंडाचा मुका घ्यायची धडपड करू नका, असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे.

दरम्यान पुण्यात कोरोना (Corona) परिस्थिती हाताबाहेर जात असताना पालकमंत्री जिल्ह्याला वेळ देत नाहीत. फोनवरही ते नागरिकांना उपलब्ध होत नाहीत. अजित पवार यांनी आता त्यांची झोप कमी करून पुण्यात लक्ष द्यायला हवं. पुणे जिल्ह्यात लक्ष घालायला त्यांना वेळ नसेल तर पुण्याचा पालकमंत्री बदलावा, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button