आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरू; देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

Devendra Fadnavis - BJP

मुंबई : ओबीसींच्या आरक्षणात (OBC Reservation) आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर खबरदार, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi) इशारा दिला आहे. भाजप (BJP) ओबीसी मोर्चा राज्य कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते. एकाच पक्षाची लोकं वेगवेगळी भूमिका घेतात. आता काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीनेही (NCP) ओबीसी आरक्षणाबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट करावी.

ओबीसी सेलने समाजातील ३ हजार ६४६ जातींना एकत्र आणणारा मेळावा आयोजित केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ओबीसी विकास महामंडळला आधी एकही पैसा दिला जात नव्हता. आपल्या सरकारच्या काळात ५०० कोटींचा निधी देत वेगवेगळ्या योजना सुरू केल्या. मात्र या सरकारच्या काळात एकही पैसा महामंडळला दिला नाही. भाजप सरकारच्या काळात महाज्योतीची निर्मिती केली आणि त्यासाठी निधी दिला; मात्र आज महाज्योती कुठे आहे, असा प्रश्न पडल्याचे ते म्हणाले. या सरकारमधील मंत्र्यांनीच ओबीसी समाजाच्या आरक्षणापुढे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मला आश्चर्य वाटतं, सरकारमधील मंत्रीच आंदोलन करत आहेत. खरं तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा. सरकारमध्ये आहात ना, मग मंत्रिमंडळमध्ये विषय मांडा. तिथे बोलणार नाही, तिथे गप्प, मात्र बाहेर बोलणार अशी स्थिती असल्याचे ते म्हणाले. विकासाची कोणतीही भूमिका मांडायची नाही. मात्र ओबीसीचे प्रश्न सोडवायचे नाही. एमपीएससी परीक्षांचे काय होणार? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER