मोदींच्या पराभवातच आनंद शोधत बसलो तर…; अस्वस्थ काँग्रेस नेत्यांनी सोडले मौन

Ragini Nayak - PM Narendra Modi

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने गेल्या वेळच्या ३ जगांवरून ७७ पर्यंत मजल मारली; पण भाजपाला सत्ता मिळाली नाही. भाजपाला सत्ता मिळाली नाही याचा आनंद साजरा करण्यात विरोधी पक्षाच्या नेत्यांसह काँग्रेसचे नेते मश्गुल असताना, भविष्याचा विचार करणाऱ्या काँग्रेसमधील अस्वस्थ नेत्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना प्रश्न विचारला आहे – आपण मोदींच्या पराभवातच आनंद शोधत बसलो, तर … ?

काँग्रेसच्या प्रवक्ता रागिनी नायक (Ragini Nayak) यांनी ट्विट केले – ”जर आपण (काँग्रेसी) मोदींच्या पराभवातच आनंद शोधत बसलो, तर आपल्या पराभवावर आत्म-मंथन कसे करणार?”काँग्रेसचे माजी नेते संजय झा (Sanjay Jha) यांनी विधानसभेच्या निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीबाबत निराश व्यक्त करताना ट्विट केले – ”माझ्यासाठी सर्वात मोठी निराशा, काँग्रेसचे पश्चिम बंगालमध्ये आत्मसमर्पण आहे. हे स्वीकारले जाऊ शकत नाही. काँग्रेस 2016 मध्ये, 44 जागा आणि 12.25 टक्के मतांसह सर्वात मोठा विरोधी पक्ष होता.”

वरिष्ठ अधिवक्ता अखिल सिब्बल (Akhil Sibal) यांनी ट्विट केले – ”मला आश्चर्य वाटते की काँग्रेस भाजपाला हरवल्याबद्दल कधीपर्यंत इतरांचेच अभिनंदन करत राहणार…?”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button