आम्हाला १५० रुपयांमध्ये लस मिळाली नाही तर आंदोलन करू : प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

मुंबई : देशभरासह राज्यातही कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . तर दुसरीकडे सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस ज्या देशांनी आपल्या येथून घेतली त्या सर्वांना ३ डॉलर ते ५ डॉलरमध्ये उपलब्ध झाली आहे. मात्र आपल्याच देशात आणि पुण्यात तयार होणारी ही लस आपल्या सर्वांना जवळपास ८ डॉलर दराने घ्यावी लागत आहे. हे चुकीचे असून यातून केंद्र सरकारची भूमिका काय आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही सरकारला आठवडाभराची मुदत देत आहोत, ही लस आम्हाला सरकारला मिळणार्‍या १५० रुपयांत मिळावी. याबाबत निर्णय जाहीर करावा, अन्यथा आम्ही आठवड्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या विरोधात आंदोलन करू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत दिला आहे.

कोविशिल्ड लसीची आधीची किंमत ‘अ‍ॅडव्हान्स्ड फंडिंग’वर आधारित होती व आता आपल्याला लसीचे उत्पादन करण्याची क्षमता वाढवण्यासाठी गुंतवणूक करायची आहे असे सांगून, या लसीची किंमत आधीच्या किमतीपेक्षा दीडपट ठेवण्याचे, देशात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने समर्थन केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button