आरक्षणासाठी एकत्र लढलो नाही तर होईल मराठ्यांचे दुसरे सामाजिक पानिपत – शिवेंद्रराजे

Shivendra Raje Bhosle

सातारा : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे मराठा तरुण नाराज आहेत. राज्य सरकारने या प्रश्नावर तातडीने तोडगा काढला पाहिजे.  नाही तर इतिहासात मराठ्यांचे पानिपत झाले असे म्हणतात; आता आपण एकत्र आलो नाही तर आपले दुसरे सामाजिक पानिपत होईल, असा इशारा शिवेंद्रराजेंनी (Shivendra Raje Bhosale) दिला. ते मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत बोलत होते.

राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत लवकरात लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे असे सांगून राज्य सरकारने एमपीएसीच्या मेगा भरतीसह इतर विषयांमध्ये गडबड करू नये, असा इशारा त्यांनी दिला. मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढले पाहिजे. त्याची गरज आहे. वेगवेगळे लढण्याची चूक कुणीही करू नये. वेगळे लढलो तर इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते मराठा समाज कधीही एकत्र येत नाही असे म्हणतात.

 मराठा समाजात दुफळी असल्याचेही बोलले जाते, हे लक्षत घेऊन सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे शिवेंद्रराजेंनी म्हटले आहे. आता आपण एकत्र आलो नाही तर दुसरे सामाजिक पानिपत होईल आणि इतिहास पुन्हा तुम्हाला माफ करणार नाही. मराठा आरक्षणाच्या प्रश्नात आता शरद पवारांनीही लक्ष घालावे, असेही ते म्हणाले. दरम्यान, मराठा क्रांती मोर्च्याचे आबा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षण उपसमिती रद्द करण्याची मागणी केली. या उपसमितीचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे ही समिती बरखास्त करा आणि नव्या सदस्यांची नेमणूक करा, अशी मागणी त्यांनी केली. मराठा आरक्षणाच्या बाबतीत भूमिका घेण्यात हे सरकार चुकले आहे, अशी टीका त्यांनी केली.

सर्व संघटना एकत्र आल्या तर त्याचा परिणाम होतो, असे सांगताना शिवेंद्रराजे म्हणाले की, मराठा संघटनांच्या मागणीमुळे सरकारला एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलावी लागली. मराठा आरक्षणासाठी जे काम करत आहेत त्यांच्या पाठीशी उभे रहाण्याची गरज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER