सत्तेत आल्यास नीती आयोग बरखास्त करू : राहुल गांधींची आणखी एक मोठी घोषणा

niti -rahul

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. जर काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत आला तर नीती आयोग बरखास्त करण्यात येईल, असे त्यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

काँग्रेस पक्ष सत्तेत आल्या नीती आयोग बरखास्त करण्याची मोठी घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी एका ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. मोदी सरकारचे मार्केटिंग आणि आकड्यांमध्ये फेरफार करण्याशिवाय नीती आयोगाने दुसरे काहीही काम केले नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

ही बातमी पण वाचा : प्रकाश आंबेडकरांना मिळाले ‘कप बशी’ निवडणूक चिन्ह, सोलापूर आणि अकोल्यातून लढणार

सत्तेत परतल्यानंतर नीती आयोगाच्या जागी अत्यंत छोटा नियोजन आयोग आणण्यात येईल. या आयोगाचे सदस्य देशाचे मोठे अर्थतज्ज्ञ आणि धोरणकर्ते लोक असतील. या आयोगात १०० पेक्षाही कमी लोकांचा भरणा असेल, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीवकुमार यांनी न्याय योजनेविरोधात मत प्रदर्शित केले होते. त्यांनी म्हटले होते की, जर अशा प्रकारची कोणती योजना लागू करण्यात आली तर त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर अत्यंत वाईट परिणाम होईल. राजीव कुमार यांच्या या विधानानंतर काँग्रेस नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे त्यांच्याविरोधात तक्रार केली होती.