… वारकरी बाहेर पडले तर सरकारच्या अंगलट येईल, बंडा तात्या कराडकरांचा इशारा

  • माघी यात्रा रद्द झाल्यानं वारकरी संतापले

सोलापूर : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये नियम कडक करण्यात आले आहेत. २३ फेब्रुवारीला होणारी माघी यात्राही रद्द करण्यात आली आहे. एकादशीच्या दिवशी पंढरपूर शहरासह दहा गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

यावरून वारकरी संप्रदाय संतापला आहे. ह. भ. प बंडा तात्या कराडकर यांनी सरकारला इशारा दिला, वारकरी बाहेर पडले तर सरकारांच्या अंगलट येईल. कराडकर म्हणालेत – मोठमोठ्या शहरातील बाजारपेठांमध्ये वारीपेक्षा जास्त गर्दी होते. राजकीय पक्षांच्या मेळाव्यांना प्रचंड गर्दी होते, ती चालते मग वारीलाच विरोध का? वारकऱ्यांचा उद्रेक होईल अशी कृती पोलिसांनी करू नये. वारकरी बाहेर पडले तर सरकारांच्या अंगलट येईल.

दरम्यान, पंढरपुरात गर्दी होऊ नये यासाठी शहरातील मठ, धर्मशाळांमध्ये आलेल्या वारकऱ्यांना मठ रिकामे करण्याचे आदेश पोलिसांनी दिले होते. मठात वारकरी आढळल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला होता. यावर वारकरी संप्रदायातून नाराजी व्यक्त होते आहे.

माघी यात्रेच्या काळात दोन दिवस श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. माघ दशमी आणि एकादशी म्हणजेच २२ व २३ फेब्रुवारी रोजी दर्शन बंद राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER