…तर तोंडाच्या वाफा दवडण्याचा जागतिक पुरस्कार उद्धव ठाकरेंना मिळाला असता, भाजपची टीका

Atul Bhatkhalkar - CM Uddhav Thackeray

मुंबई : परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील शेतपिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. हाताशी आलेल्या सोन्यासारख्या पिकासह शेतातील मातीदेखील वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. त्यानंतर विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज सोलापुरच्या (Solapur) अक्कलकोट तालुक्यातील काही नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या या दौऱ्यानंतर पत्रकार परिषद घेऊन पुढील कार्यवाहीची माहिती दिली.

यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) आरोपांवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘फडणवीस बिहारला जातात त्यांनी दिल्लीला जावं पंतप्रधान घराबाहेर पडतील’ असा टोला लगावला आहे. मी कोणतीही घोषणा केली नाही, हे करु ते करु, सांगितलेलं नाही. आधी अंदाज घेऊ, माहिती घेऊ आणि जे करायचं ते करु असं त्यांनी सांगितलं आहे. तर, सद्या पंचनामे सुरु आहे, त्यानंतर प्रत्यक्ष मदत करू, असं ठाकरेंनी या पत्रकार परिषदेत सांगितलं.

उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केल्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शेलक्या शब्दांत मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. ‘तोंडाच्या वाफा दवडण्याबद्दल एखादा जागतिक पुरस्कार असता तो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाच मिळाला असता. शेतकऱ्यावर आलेली भीषण आपत्ती पाहून त्यांना मदत करण्याची दानत नाही आणि कर्तृत्वही नाही, शेतकऱ्याचे अश्रू पुसणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांची सवंग टीका मात्र सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER