उद्धव ठाकरे पंतप्रधान झाल्यास सोनिया गांधी आणि पवारांनी उपपंतप्रधान म्हणून काम करावं – दरेकर

बुलढाणा : शिवसेनेचे (Shivsena) जनसंपर्क प्रमुख व माध्यम सल्लागार हर्षल प्रधान यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे देशाचे पंतप्रधान व्हावे, अशी सर्वसामान्यांची इच्छा असल्याचे म्हटले होते. त्यावर प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी खोचक शब्दात शिवसेनेला लक्ष्य केले. उद्धव ठाकरे यांच्या रूपाने मराठी माणूस पंतप्रधान झाला तर सर्वांनाच  अभिमान वाटेल. मात्र, त्यासाठी खासदारांचे संख्याबळ लागते, असा उपरोधिक टोला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला लगावला. तसेच भविष्यात उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपपंतप्रधान म्हणून त्यांच्या हाताखाली काम करावं, अशी खोचक टीकाही प्रवीण दरेकर यांनी केली. ते शनिवारी बुलडाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी त्यांनी जालना येथे भाजपच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीबाबतही भाष्य केले. पोलिसांनी केलेले कृत्य अतिशय निंदनीय आहे. कायद्याचे रक्षकच कायदा हातात घेत आहेत. या प्रकरणात पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती मिळाली. यात या प्रकरणात पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही करत आहोत. यासाठी वरिष्ठ पातळीवर मागणी करण्यात येईल. जर आमची मागणी मान्य झाली नाही तर जे काय करायचे ते आम्ही करू, असा इशाराही दरेकर यांनी यावेळी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button