एखाद्या गरीबाच्या पोटात दोन घास गेले तर मला मंदीरात गेल्यासारखे वाटेल : नाना

nana patekar

पुणे : एकीकडे अयोध्या येथील राम मंदीराच्या मुद्दावरून वादळ उठले असताना अभिनेता नाना पाटेकर यांनीही राममंदीराच्याबाबत वक्तव्य केले आहे. ते म्हणाले काही जणांना राम मंदीराचा मुद्दा महत्वाचा वाटत असेल पण मला एखाद्या गरीबाच्या पोटात दोन घास गेले तर मंदीरात गेल्यासारखे वाटेल. नानांनी हे मत पुण्यातील एका कार्यक्रमात व्यक्त केले.

ही बातमी पण वाचा:- दुष्काळाग्रस्तांना भिकाऱ्यासारखी वागणूक देऊ नका : नाना पाटेकर 

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम’ संस्थेने पुण्यातील खडकवासला धरणातील गाळ उपसा करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमात नाना पाटेकर बोलत होते. ते म्हणाले, कोण कसे विचार करते यावर सगळे अवलंबून आहे. काहींना राम मंदिर बांधावंसे वाटत असेल तर तो त्यांचा निर्णय आहे. पण एखाद्या गरीबाच्या पोटात दोन घास गेले तर मला मंदिरात गेल्यासारखेच वाटेल.

शेतकऱ्यांच्या मोर्चाबाबतही नाना बोलले. शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण होत नसतील म्हणून हे मोर्चे निघतात. शेतकऱ्यांसाठी एकटे सरकार सगळ्या गोष्टी पूर्ण करू शकणार नाही. त्यासाठी सामाजिक संस्थांनीही मदतीचा हात पुढे करायला हवा, असंही ते म्हणाले.