विकासाची फळे चाखायची असेल तर धुळे मनपात भाजपची सत्ता पाहिजे : मुख्यमंत्री

CM

धुळे : विकासाची फळ चाखायची असतील, तर महापालिकेत भाजपचे सरकार पाहिजे. धुळ्यात राज्य चालेल तर कायद्याचे, गुंडागर्दीचे नाही. धुळे भयमुक्त केले जाईल. केंद्रात भाजपा, राज्यात भाजपा आणि धुळ्यात गुंडांचे राज्य, असे चालणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात धुळे महापालिकेत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला आणि घोषणांचा पाऊस पाडला. धुळे महापालिकेत गेली 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. धुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी जंगी सभा घेतली. सभेला गिरीश महाजन, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे अशी सर्व दिग्गज नेते उपस्थित होते.

यावेळी केलेल्या महापालिका हे टक्केवारीचं ठिकाण बनवले, आता परिवर्तनाची वेळ आली आहे तुम्ही धुळ्याची सत्ता द्या आणि विकासाची जबाबदारी माझ्यावर सोपवा असे आवाहनही त्यांनी केले. धुळ्याचे नागरिक सोशिक आहेत. इथे पिण्याचे पाणी नाही, गटारीची अवस्था वाईट आहे, रस्ते नाहीत, पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी धुळ्याकडे दुर्लक्ष केल्याचे ते म्हणाले.

रेल्वे प्रकल्प, रस्ते प्रकल्प, डीएमआयसी यामुळे आता अनेक विकास कामं होत आहेत. त्यामुळे रोजगार संधी निर्माण होतील. धुळ्यातील अतिरिक्त कराच्या प्रश्नात सरकार लक्ष घालेल. त्यात सुसूत्रता आणण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आज केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर गुंतवणुकीचा वेग वाढला असून धुळ्याला उत्तम शहर बनवू असे आश्वासनही त्यांनी दिलंधुळ्यातील हद्दवाढीतील गावांसाठी विशेष आराखड्याला मंजुरी दिली जाईल. शहर बकाल असतील, तर तेथे गुंतवणूक येत नाही, असेही ते म्हणाले.