आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघाची ही अवस्था आहे तर… मनसेचे शिवसेनेला खडेबोल

Aaditya Thackeray - Uddhav Thackeray - Sandeep Deshpande

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस बरसला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबलेली पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर मनसेने महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेनेवर (Shiv Sena) टीकास्त्र सोडले . वरळी मतदारसंघात हनुमान गल्ली परिसरात जवळपास २० हून अधिक मॅनहोल्स उघडे असल्याचे मनसेने (MNS) समोर आणले.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा हा मतदारसंघ असूनही ही अवस्था इथे आहे तर मुंबई शहराचं काय, असा सवाल मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी उपस्थित केला. महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) फक्त दावा करतात, मात्र किती मॅनहोल्स सुरक्षित आहेत ते त्यांनी तपासावे. आमदारांनी इथून एक राऊंड मारावा. महापौर लोकांचे बाप काढतात त्यांनी जास्त शहाणपणा शिकवू नये, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button