त्यांनी ऐकलं नाही तर आपण कंपन्यांत घुसू; प्रवीण तरडेंचा संताप

Maharashtra Today

पुणे :- पुण्याच्या मुळशी तालुक्यात औद्योगिक वसाहतीत आगीची मोठी दुर्घटना (Industrial estate in Mulshi taluka) घडली. या आगीत एकूण १८ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. मंगळवारी घटनास्थळी प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे (Praveen Tarde) यांनी यांनी भेट दिली. ‘आपले भाऊ-बहीण कुठे आणि कशा अवस्थेत काम करतात, पाहणी केलीच पाहिजे. मुळशी तालुक्याची रग दाखवून देऊ, कंपन्यांत घुसून पाहणी करू.’ असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

मुळशीचे भूमिपुत्र
प्रवीण तरडे हे मुळशीचे भूमिपुत्र आहेत. वयाच्या २०-२२ व्या वर्षी त्यांनी काही वर्षे त्या परिसरातील कंपनीत काम केले. त्यांना तेथील परिस्थितीची जाणीव आहे. “मी इथल्याच शेजारच्याच कंपनीत जवळपास २ ते ३ वर्षे काम केले आहे. मला इथली परिस्थिती माहिती आहे. आपले आय-बाप, बहीण-भाऊ असेच महिन्या-वर्षांनी जळणार आणि आपण हाच तमाशा पाहात बसायचं का?” असा सवाल त्यांनी केला. “मी इथल्या सगळ्या सरपंच आणि उपसरपंच यांना विनंती करतो की, आपले भाऊबहीण, आईबाप, आपले नातलग जिथे कुठे काम करत असेल तिथे जाऊन त्यांना विनंती करू. आमच्या जवळच्या माणसांची पाहणी करू द्या. त्यांनी नाही ऐकलं तर आपण कंपन्यांत घुसू. ते कोणत्या परिस्थितीत काम करतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. नाही तर आपल्यावर असाच तमाशा बघण्याची वेळ येईल. म्हणजे २० माणसे वाचली यात आनंद मानायचा की दुर्दैव… ४० बाय ४०च्या ठोकळ्यात १०-१२ केमिकलच्या मशीन्स आहेत आणि ३८ माणसे कामाला आहे, हे कसे शक्य आहे?” असाही संतप्त सवाल त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button