खरा क्रिश असतो तर कोरोना संपवला असता – ऋतिक रोशन

Hritik Roshan - Coronavirus - Krrish

हिंदी चित्रपटसृष्टीत पहिला सुपरस्टार सुपरहीरो म्हणून ऋतिक रोशनने (Hrithik Roshan) क्रिशद्वारे (Krrish) प्रचंड यश मिळवले. क्रिश 2 मध्ये ऋतिक रोशनने संपूर्ण जगाला एका व्हायरसपासून वाचवल्याचे दाखवण्यात आले होते. सध्या ऋतिक क्रिश 4 मध्ये व्यस्त असला तरी सोशल माडियावर सक्रिय असतो.

काही दिवसांपूर्वी ऋतिकने कोरोना काळात आपल्या मुलांसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोवर प्रतिक्रियांचा प्रचंड पाऊस पडला होता. ऋतिकच्या एका प्रशंसकाने फोटोवर कमेंट करताना हातात सिगरेट आहे का असा प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना ऋतिकने म्हटले, मी अशा व्यसनांपासून दूर असून कधीही सिगरेट पीत नाही. मी जर खराखुरा क्रिश असतो तर सध्याच्या कोरोनाचा (Corona) नायनाट तर केलाच असता पृथ्वीवरील सगळ्या सिगरेटही नष्ट करून टाकल्या असत्या.

ऋतिक रोशन कॉलेजमध्ये असताना कधी तरी सिगरेट प्यायचा परंतु नंतर त्याने व्यायाम सुरु केला आणि सिगरेटला कायमचा रामराम ठोकला. ऋतिक आपल्या शरीराकडे प्रचंड लक्ष देतो आणि ते सुदृढ कसे राहील याची काळजी घेत असतो. आपल्या मुलांनाही त्याने व्यायामाची सवय लावली आहे. त्याची मुले हेवी व्यायाम नव्हे तर सध्या स्टॅमिना वाढवण्याकडे लक्ष देत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER