मुख्यमंत्री असतो तर बच्चू कडूंचा राजीनामा घेतला असता – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

नागपूर :  महाराष्ट्राचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बाईकवर दिल्लीला जाऊन शेतकरी आंदोलनात भाग घेतला. मंत्री असताना आंदोलनात भाग घेतल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी कडूंवर टीका केली आणि मी मुख्यमंत्री असतो तर बच्चू कडूंचा राजीनामा घेतला असता, असे म्हणालेत. पत्रपरिषदेत या विषयावर बोलताना ते म्हणालेत, मंत्रिमंडळातील मंत्र्यांना आंदोलन करण्याचा अधिकार नाही. एकतर मंत्री राहा नाही तर आंदोलन करा. मी मुख्यमंत्री असतो तर कडूंचा राजीनामा मागितला असता.

आंबेडकर यांनी राज्य सरकार आणि भाजपावर टीका केली. म्हणालेत, महाराष्ट्र् सरकारने दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला तो फक्त तोंडदेखला आहे. पंजाब सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारदेखील कायदा का करत नाही? अधिवेशनाचे दोन दिवस कांजूरमार्ग आणि कंगनावर गेले. शेतकऱ्यांसाठी वेळच नाही. अधिवेशन नाही तर आम्ही काय करायचे? दोन दिवसांच्या अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी कायदा का केला  नाही? भाजपा घटनाबाह्य वागत आहे, असा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना करतात; मात्र हे तीन पक्षदेखील घटनाबाह्य वागत आहेत, अशी टीका त्यांनी केली. आरएसएस, भाजपा यांची मांडणी पूर्णपणे हुकूमशाही पद्धतीची आहे. हे दिल्लीच्या आंदोलनावरून दिसून येते. शेतकरी थंडीत बसले आहेत. मात्र सरकार निर्णय घेत नाही.

आम्ही कायदा केला तुम्ही मान्य करा, अशी भूमिका आहे. आम्ही शेतकऱ्यांचे अभिनंदन करतो आणि पाठिंबा देतो. हे तीन कायदे आल्यानंतर सरकारी खरेदी संपली असेल, असे आंबेडकर म्हणाले. सरकार खरेदी करणार नाही मग फूड सिक्युरिटीचं काय होणार? फूड सिक्युरिटी द्यायची नाही अशी सरकारची भूमिका दिसते. शासन खरेदी करणार नसेल तर नागरिकांना सबसिडीचे अन्न-धान्य मिळणार नाही. त्यांनी जगायचे कसे? असा प्रश्न त्यांनी केला.

वंचित ग्रामपंचायत निवडणूक लढणार
आज पूर्व विदर्भातील अॅक्टिव्ह कार्यकर्त्यांचे शिबिर घेण्यात आले. ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनल कसे करायचे यावर मंथन झाले. वंचित बहुजन आघाडीच्या नावाने आमचे उमेदवार असतील. आम्ही ग्रामपंचायत ताकदीने लढणार आहोत, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER