‘बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी…’ शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल

Ashish Shelar - Uddhav Thackeray

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कंगना विरुद्ध शिवसेना (Shiv Sena) असे द्वंद्व युद्ध सुरू आहे. त्यातच कंगनाच्या पाठीशी भाजप (BJP) ठामपणे उभा असल्याने शिवसेनेने आजच्या ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधत महाराष्ट्रातील बेइमानांच्या पाठीशी जे उभे आहेत, त्यांना १०६ हुतात्म्यांचे तळतळाट लागतील.

मुंबई मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील, असं शिवसेनेनं भाजपला अप्रत्यक्षरीत्या म्हटलं होतं. यावर भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. बात ‘हरामखोरी’ची निघाली तर मग ‘डांबरा’ने लिहिले जाईल, असे मुंबईकरांना बरेच आठवेल! १०६ हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेस (Congress) सोबतच सत्तेत बसलात ना? मुंबई मातेचा अपमान कोण करतेय? बेइमानी नेमकी कोण करतेय? हुतात्म्यांचे तळतळाट तुम्हाला तर लागणार नाही ना? एवढे तपासून पहा, असे ट्विट करून आशिष शेलार यांनी शिवसेनेला सुनावले आहे. एकापाठोपाठ एक ट्विट करत शेलार यांनी शिवसेनेवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.

मुंबई साखळी बॉम्बस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांना मारणाऱ्या टायगर मेमनच्या माहीमच्या घरात, ऑफिसमध्ये महापालिका बुलडोझर घेऊन घुसवली होती का? पण रस्त्यावरच्या खड्ड्यांवर बोलणाऱ्या रेडिओ जॉकी मलिष्काच्या घरात आणि कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) घरात पालिका अधिकारी घुसवलेत ना? असा प्रश्नही शेलार यांनी सेनेला केला आहे.

भारत तेरे तुकडे हो हजार, असे म्हणणाऱ्या उमर खालिद गँगला मुंबईत येण्यास कधी रोखले नाहीत ना? त्यांच्या कार्यक्रमात सोबत बसायला निघाला होतात ना? गेट वे ऑफ इंडियाला आझाद काश्मीरचा फलक झळकवणाऱ्या देशविरोधी मेहक प्रभूच्या घरात पालिका कधी घुसवली नाहीत ना? असा प्रश्नही आशिष शेलारांनी शिवसेनेला विचारला आहे. त्याचसोबत कर्तबगार मुंबई पोलिसांवर (Mumbai Police), मुंबईकरांवर गोळ्या झाडणाऱ्या कसाबला ‘बिर्याणी’ घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची ‘बिर्याणी’ खाताय ना? याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यालाच मुंबईचा पालकमंत्री केलेत ना? बेइमानी, तळतळाट हे तुम्हालाच तर लागत नाहीत ना? ‘बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी’ अशा शब्दांत शेलारांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे.

त्याचसोबत कर्तबगार मुंबई पोलिसांवर (Mumbai Police), मुंबईकरांवर गोळ्या झाडणाऱ्या कसाबला “बिर्याणी” घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची “बिर्याणी” खाताय ना? याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यालाच मुंबईचा पालकमंत्री केलेत ना? बेईमानी, तळतळाट हे तुम्हालाच तर लागत नाहीत ना? “बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी अशा शब्दात शेलारांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER