कृषी कायद्यांना विरोध आहे तर त्याविरोधात विधेयक मंजूर का करत नाही? : मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar

मुंबई : केंद्राच्या कृषी कायद्यांना विरोध करणारे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार त्याविरुद्ध विधेयक का मंजूर करत नाही, असा प्रश्न भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केला आहे. राज्यातले महाआघाडीचे सरकार पाच वर्ष नाही तर २५ वर्षे टिकेल, असा दावा महाआघाडीचे नेते करत असतात, यावर टोमणा मारताना मुनगंटीवार म्हणालेत, आघाडीचे सरकार पाच नाही, पाच हजार वर्षे टिकू द्या; फक्त जनतेलाही जगू द्या.

शेतीविषयक कायद्याचा उपयोग भ्रमनिरास करण्यासाठी होतो आहे, हे चांगले नाही. शेतकरी कायद्याचा अर्थ चुकीचा काढला जातो आहे. आधीच्या सरकारचे धोरण शेतकऱ्यांचे मरण होते. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी हाच या कायद्याचा उद्देश आहे. त्यातला कोणताही मुद्दा पटत नसेल तर चर्चा आणि संवाद करता येऊ शकतो. योग्य पद्धतीने कायदा वाचला तर अर्थ समजेल. उणीव असेल तर पंतप्रधान मोदी यांची वेळ घेऊन भेटा आणि चर्चा करा, असे आव्हान मुनगंटीवार यांनी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER