चूक नसेल तर घाबरण्याचे काम नाही, वर्षा राऊत यांच्या नोटीसवर फडणवीसांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis

सांगली :- शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नीला वर्षा यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. याबाबतच्या प्रश्नावर प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणालेत, चूक नसेल तर घाबरण्याचे काम नाही.

या नोटीस प्रकरणात सरकारला आव्हान देताना राऊत यांनी गाणे ट्विट केले –

आ देखें जरा किसमें कितना है दम

जमके रखना कमद मेरे साथी आ

राऊत यांच्या या गाण्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रियेत टोमणा मारला. म्हणालेत, संजय राऊत ट्वीट करत असतात, त्यांच्यामध्ये खूप प्रतिभा आहे… त्यांना अनेक शेर-गाणी पाठ आहेत. राऊत यांना दुसरे काम नसते त्यावेळी ते शेर आणि गाणं ट्वीट करत असतात.. त्याच्यावर मी उत्तर कशाला देऊ? मी ईडी प्रवक्ता नाही त्यांनाच विचारा. कुणी चांगले काम केले तर त्यांना नोटीस मिळत नाही, चूक नसेल तर कुणी घाबरण्याचे काम नाही.

दरम्यान, ईडी सुडाचे राजकारण करते, राऊत यांच्या या आरोपाचा समाचार घेतांना भाजपाचे आमदार राम कदम म्हणालेत – मुंबई पोलीस यंत्रणा वागते त्याचे समर्थन शिवसेना करते आणि ईडी नोटीस आली की सूडाचे राजकारण म्हणते ! वर्षा राऊत यांना २९ डिसेंबर रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यातची माहिती आहे.

ही बातमी पण वाचा : … राज्याचे हजारो कोटींचे नुकसान करणारा निर्णय तत्काळ स्थगित करा; फडणवीसांनी मुख्यमंत्रांना लिहिले पत्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER