बंगले दुरुस्ती, वाहने खरेदीसाठी पैसा आहे, तर पॅकेजसाठी का नाही?- चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

औरंगाबाद :- शेतकरी, एसटी कर्मचारी, मराठा आरक्षणासह बारा बलुतेदारांचे हलाखीचे जगणे आदी विविध प्रश्न राज्य सरकारला सोडवता येत नसल्याची टीका करत, येत्या काळात भाजपतर्फे आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली. मंत्र्यांचे बंगले दुरुस्तीवर, नवी वाहने खरेदीसाठी पैसा आहे तर पॅकेजसाठी का नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे (BJP) उमेदवार घोषित करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सोमवारीच दोन एसटी कर्मचाऱ्यांनी कुटुंब चालवणे अशक्य असल्याचे कारण देत आत्महत्या केली आहे. टाळेबंदीच्या काळत नाभिक समाजात २८ जणांनी आत्महत्या केली आहे. त्यांना आम्ही एक-एक लाखाची मदत केली आहे. समाजातील साधारण २० घटकांतील वर्गाला हलाखतीचे जीवन जगावे लागले. फेरीवाल्यांना १० हजार रुपयांचे परतीच्या अटीवर आणि कमी व्याजदरावर कर्ज दिले आहे, याकडे लक्ष वेधत पाटील यांनी हातावरचे पोट असणाऱ्या घटकांना महाराष्ट्र शासनाने पॅकेज देणे अपेक्षित होते, असे सांगितले. मराठवाड्यात सोयाबीनसह कापसाचेही पीक जाण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्यांना मदत करण्यासाठी १० हजार कोटींचे पॅकेज हे तोकडे आहे. आमच्या सरकारच्या काळात केंद्राकडून अधिकची मदत मिळवून दिल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

पश्चिम महाराष्ट्रात महापुराच्या काळात नुकसानग्रस्तांचे कर्ज माफ केल्याचाही दावा त्यांनी केला. कांजूरमध्ये प्रकल्प हलवण्याचा निर्णय खर्चिक असून खर्च वाढणार असल्याने प्रकल्प चार-दोन वर्षे सुरू होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : नाराजी तर होणारच; ती दूर करू : चंद्रकांत पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER