युद्धासारखी स्थिती आल्यास रणगाडे खरेदी करायला सांगणार का? केजरीवालांचा केंद्राला सवाल

Arvind Kejriwal

नवी दिल्ली :- कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आजपासून ड्राईव्ह-इन लसीकरण अभियान सुरू करण्यात आले आहे. दिल्लीकरांना त्यांच्याच कारमध्ये बसून लस दिली जाणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते या लसीकरण अभियानाला सुरुवात झाली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. जर पाकिस्तानने आपल्यावर हल्ला केला तर राज्यांनी आपापले रणगाडे खरेदी करायचे का? असा सवाल अरविंद केजरीवालांनी (Arvind Kejriwal) केंद्र सरकारला विचारला.

केजरीवालांचा घणाघात
केंद्र सरकार आजही कोरोना संकटात (Corona Crisis) गंभीर नाही, असा आरोप केजरीवाल यांनी केला. राज्याने आपल्या लसींची सोय करावी, असे केंद्राने सांगितले आहे. केंद्र लसींबाबत अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहे; मात्र, एक लसही मिळवता आली नाही. लस बनवणाऱ्या कंपन्या केंद्राकडे बोट दाखवतात. सर्व टेंडर फेल होत आहेत. मग राज्यांनी करायचे काय? केंद्र देशासाठी लस का खरेदी करत नाही? असा सवाल केजरीवालांनी विचारला.

ही बातमी पण वाचा : मोदी सरकारचे लसीकरण धोरण अयशस्वी, याला जबाबदार कोण? प्रियंका गांधींचा सवाल

टीम इंडिया बनून काम करा
ही वेळ भारताला एकत्र येऊन काम करण्याची आहे, टीम इंडिया म्हणून या संकटाला तोंड द्यायला हवे. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री शिपायाप्रमाणे लढा देत आहेत; मात्र केंद्राचे काम आम्ही कसे करू. जर पाकिस्तानने भारताविरुद्ध युद्ध छेडले तर तुम्ही राज्यांना रणगाडे खरेदी करायला सांगणार आहे का? असा संतप्त सवाल केजरीवाल यांनी केंद्राला केला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button