योगी सरकार बरोबर तर, माध्यमांची अडवणूक का? – संजय राऊत

Sanjay Raut & Yogi Aditya Nath

मुंबई : उत्तर प्रदेश घटनेचे देशभरात पडसाद उमटले आहे. देशभरातून या घटनेवर संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच महाराष्ट्रातील नेत्यांनीही हे प्रकरण चांगलेच उचलून धरले आहे. यावर पुन्हा शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देताना योगी (yogi adityanath) सरकारवर निशाणा साधला आहे.

उत्तर प्रदेश सरकारने काहीच केले नाही तर, माध्यमांना तिथे जाण्यापासून का रोखले जात आहे? असा प्रश्न विचारला आहे. “मला कळत नाही का माध्यमांना अडवण्यात आले आहे. जर सरकारने काहीच चुकीचे केलेले नाही, तर या प्रकरणातील तथ्यं बाहेर काढण्यासाठी माध्यमांना त्या ठिकाणी (हाथरस) जाऊ दिले पाहिजे.” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER