काम चांगले केले नसेल तर ठेकेदारांना खपवतो, अजित पवारांनी दिला दम

Ajit Pawar

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन केले केंद्राचे काम चांगले केले नसेल तर ठेकेदारांना बघून घेण्याचा इशारा दिला. म्हणालेत, रणवरे नावाच्या कंत्राटदाराने काम केले आहे. काम कसे झालं ते पावसाळ्यात कळेल. लाईटचे काम केलेल्या खपले ठेकेदारालाही काम चांगलं नसेल तर खपवतो!

ते म्हणालेत, विकासकामी करणे हे आमचं प्राधान्य आहे. सामान्य माणसांसाठी शासनाकडून आरोग्यकेंद्र उभारले जाते. माळेगावसारखं प्राथमिक आरोग्य केंद्र काटेवाडीतही नाही. आरोग्यविषयक सुविधा कमी पडू नयेत याकडे सरकारचे लक्ष आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER