
मुंबई : बुलेट ट्रेनची सुरुवात होणाऱ्या वांद्रे-कुर्ला संकुलातील जागेत मेट्रोची कारशेड उभारण्यासाठी चाचपणी सुरू झाली असतानाच, केंद्र सरकारच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या डहाणूजवळील वाढवण बंदराला राज्य सरकारकडून सहकार्य मिळण्याची शक्यता कमीच दिसत आहे. यावरून आता राज्य व केंद्र सरकारमध्ये नवा वाद होण्याची चिन्हं आहेत.
या पार्श्वभूमीवर भाजपा (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारवर टीकास्त्र सोडले .खारे पाणी गोडे करण्याचा प्रस्ताव आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही म्हणून ठाण्यात रद्द झाला. मग,असा प्रकल्प २०० पट अधिक खर्च करून मुंबईला तरी कसा परवडणार? वाढवण बंदर जर समुद्री पर्यावरणाला घातक असेल तर मुंबईचा प्रकल्पही घातक ठरू शकतो? म्हणून कंत्राटदार प्रेमाची, बालहट्टाची लाट आवरा! अशा शब्दांमध्ये शेलार यांनी ट्विट करून ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले.
खारे पाणी गोडे करण्याचा प्रस्ताव आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही म्हणून ठाण्यात रद्द झाला.
मग,असा प्रकल्प 200 पट अधिक खर्च करुन मुंबईला तरी कसा परवडणार ?
वाढवण बंदर जर समुद्री पर्यावरणाला घातक असेल तर मुंबईचा प्रकल्पही घातक ठरु शकतो?
म्हणून कंत्राटदार प्रेमाची, बालहट्टाची लाट आवरा!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 20, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला