कोरोनाची तिसरी लाट आली तर उद्योग थांबता कामा नये: उद्धव ठाकरेंचा उद्योजकांशी संवाद

Cm Uddhav Thackeray - Maharashtra Today

मुंबई : राज्यावर संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका आहे . यापार्श्वभूमीवर कोरोना (Corona) काळातही संपूर्ण काळजी घेऊन महाराष्ट्राने उद्योग चालवून दाखविले असे उदाहरण मला देशात निर्माण करायचे आहे.त्यामुळे आरोग्याचे नियम पाळत रहा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केले. ठाकरे यांनी रविवारी राज्यातील उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते .

कोरोनाची तिसरी लाट आली आणि आणि लॉकडाऊन (Lockdown) करावा लागला तरी उद्योगांच्या दैनंदिन कामकाजावर , उत्पादनावर परिणाम झाला नाही पाहिजे. आपण कॅलक्युलेटेड रिस्क घेत आहोत अनलॉक करताना त्यामुळे काळजी घ्या. एकदम काहीही शिथिल केलेले नाही. ‘साप भी मरे और लाठी भी ना तुटे’, असे आपल्याला वागावे लागेल, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी उद्योजकांना दिला.

राज्यातील इतर उद्योगांमध्ये बाहेरील राज्यातील जे कामगार काम करीत आहेत त्यांची आरोग्यविषयक नोंद व्यवस्थित ठेवा. त्यांनी त्यांच्या राज्यात जाताना आणि तिकडून येताना कोविडचा विषाणू पसरवू नये . त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची देखील माहिती ठेवा. कामगार परराज्यातून आल्यानंतर त्यांना विलगीकरणात ठेवावे, त्यांची तपासणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांना दिले.

या बैठकीस उद्योग मंत्री सुभाष देसाई, सीआयआयचे पदाधिकारी उदय कोटक, संजीव बजाज, बी थियागराजन, डॉ नौशाद फोर्बस, अमित कल्याणी, अशोक हिंदुजा, ए एन सुब्रमनियन, डॉ अनिश शहा, अजय पिरामल,बनमाली अग्रवाल, हर्ष गोयंका, सुनील माथुर, उज्वल माथुर, संजीव सिंग, बोमन इराणी, निरंजन हिरानंदानी, जेन करकेडा, असीम चरनिया, सुलज्जा फिरोदिया हे उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button