ठाकरे सरकारने अडवणूक केली तर बुलेट ट्रेन धावणार फक्त गुजरातमध्ये

Vinod Kumar - Bullet Train

मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनच्या (Bullet Train) थांब्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने गुंडाळून लावला. केंद्र राज्यातील संघर्षातून बुलेट ट्रेनचं काम लांबण्याची चिन्ह आहेत. या संदर्भात रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोदकुमार (Vinod Kumar) म्हणाले की, जागा मिळण्यास विलंब झाला तर फक्त गुजरातमध्ये बुलेट ट्रेन चालवण्याची शक्यता तपासून पाहिली जात आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्पात ठाणे-दिव्यालगतच्या म्हातार्डी भागात स्थानक उभारण्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव ठाणे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने (Shiv Sena) मागील आठवड्यात गुंडाळला. या मुद्यावर बोलताना रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार म्हणालेत, बुलेट ट्रेन प्रकल्प एकत्र करण्याची भारतीय रेल्वेची इच्छा आहे, त्यादृष्टीने आम्ही योजना तयार करत आहोत. महाराष्ट्र सरकारने आगामी चार महिन्यात ८० टक्के जमीन उपलब्ध करून देण्याची हमी दिली आहे.

ही बातमी पण वाचा : नव्या वर्षात देशासाठी ‘हा’ संकल्प करा; पंतप्रधान मोदींच देशवासीयांना ‘मन कि बात’ मधून आवाहन

प्रकल्पाला जागा मिळाली, तर बुलेट ट्रेन महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांमध्ये धावेल. मात्र, जागा उपलब्ध करून देण्यास उशिर झाला, तर पहिल्या टप्प्यात फक्त गुजरातमध्ये बुलेट ट्रेन चालवू शकतो का, याचीही तयारी आम्ही करत आहोत, असे विनोद कुमार यादव म्हणाले.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे (एनएचएसआरसीएल) (NHSRCL) या प्रकल्पासाठी जागा हस्तांतराची प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या प्रकल्पात खासगी जमिनींसाठी हेक्टरी ९ कोटी रुपये मोबादला निश्चित करण्यात आला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER