ठाकरे सरकारने फटाके विक्रीवर बंदी आणली तर आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ

Diwali Firecrackers - CM Thackeray

मुंबई :- यंदा कोरोना (Corona) संकटाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीतील फटाक्यांवर सरकारने बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आधीच लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प पडल्याने व्यावसायिक त्रस्त झाले आहे. त्यातच आता फटाके विक्रीवर बंदी आणण्याने फटाके व्यावसायिकांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे कोरोना काळात राज्य सरकारने फटाक्यांवर बंदी आणू नये. आजवर ज्या प्रकारे फटाका विक्री करण्यास परवानगी दिली आहे, त्यानुसार राज्य सरकारने परवानगी द्यावी. अशी मागणी पुणे फटाका विक्री असोसिएशनचे दादासाहेब देवकर यांनी केली आहे. जर फटाका विक्रीवर बंदी (Ban on sale of firecrackers) घातल्यास आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी दादासाहेब देवकर म्हणाले की, “मागील कित्येक वर्षांपासून आम्ही फटाका विक्री करीत आहोत. यामधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. या काही दिवसांच्या व्यवसायाच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार मिळतो. मात्र यंदाच्या कोरोनामुळे लग्न सोहळे झाले नाहीत. त्यामुळे आमच्यासह इतर व्यवसायांनादेखील फटका बसला आहे. मात्र आता काही राज्यांनी फटका विक्रीवर बंदी घातली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने असा निर्णय घेऊ नये. आमचं सर्वकाही याच व्यवसायावर अवलंबून आहे.”

तसेच ते पुढे म्हणाले की, फटका विक्रीवर बंदी आणल्यास अनेक व्यावसायिक कर्जबाजारी होतील आणि त्यामुळे आमच्यावर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने आमच्या व्यवसायाचा विचार करून, पूर्वीसारखा करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER