संसदेचे अधिवेशन व्यवस्थित चालते तर विधानसभेचे का नाही? फडणवीसांचा प्रश्न

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray

मुंबई :- महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन फक्त १ ते ८ मार्चच होण्याची शक्यता आहे. यावर टीका करताना माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fanavis) यांनी प्रश्न केला की, संसदेचे अधिवेशन व्यवस्थित चालते तर विधानसभेचे का नाही?

विधिमंडळामध्ये कामकाज सल्लागार समितीची काल बैठक झाली. या बैठकीनंतर फडणवीस म्हणालेत की, राज्य सरकारने अधिवेशनाचा कालावधी (Parliament session) कमी ठेवण्याची भूमिका घेतली आहे. राज्यासमोर आज अनेक प्रश्न असताना अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान चार आठवडे झाले पाहिजे. अधिवेशनाचा कालावधी १ ते ८ मार्च ठरविण्यात आला आहे. कामकाज सल्लागार समितीची पुन्हा एकदा २५ तारखेला बैठक होईल आणि त्यात अधिवेशना संदर्भातील अंतिम निर्णय घेतला जाईल.

यापूर्वी झालेल्या अधिवेशनामध्ये पण कालावधी जास्त हवा अशी मागणी भारतीय जनताने घेतली होती पण कोरोनाच्या साथीमुळे अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आला होता.

ही बातमी पण वाचा : मोठ्या अभिनेत्यांबद्दल विधान केले की दिवसभर प्रसिद्धी मिळते; फडणवीसांचा पटोलेंना टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER