राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो तर मराठा आरक्षणाचा का नाही? – अशोक चव्हाण

Ashok Chavhan

परभणी :- या देशात कलम ३७० आणि राम मंदिराचा प्रश्न सुटू शकत असेल तर मराठा आरक्षणाचा (Maratha Arkashan) प्रश्न का सुटू शकत नाही? असा सवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनी केला.

परभणी येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते म्हणाले की, मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटण्यासाठी दिल्लीतील नेत्यांनी सकारात्मकता दाखवली पाहिजे. मराठा आरक्षणावर सरकार गंभीर नाही, असा आरोप होतो आहे. हा आरोप राजकीय आहे. भाजपावाले या विषयात घुसले असून त्यांनीच मराठा आरक्षणावर सरकार गंभीर नसल्याची बोंब उठवली आहे, असा आरोप त्यांनी केला.

सरकार मराठा आरक्षणावर गंभीर असून कामही करते आहे. हा प्रश्न खंडपीठाकडे ठेवून चालणार नाही. तो घटनापीठाकडे असावा, असे आमचे म्हणणे होते, असे चव्हाण म्हणाले.

ही बातमी पण वाचा : दिल्लीतील काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत आघाडीसाठी अनुकूल नव्हते : अशोक चव्हाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER