देशातील जनतेला न्याय हवा असेल तर राज्यघटनेच्या पुर्नतपासणीची गरज : मंत्री सत्यपाल सिंह

नवी दिल्ली : देशातील जनतेला न्याय हवा असेल तर राज्यघटनेच्या पुर्नतपासणीशिवयाय तो मिळणे शक्य नसल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री सत्यपालसिंह यांनी केल्यामुळे भाजपा अडचणीत येण्याची शक्यता आहे. सिंह हे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिल्ली विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

सिंह यांनी राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेवरदेखील शंका उपस्थित केली. राज्यघटनेत गेल्या काही दशकात हस्तक्षेप करण्यात आला असल्यामुळे राज्यघटनेच्या पुनर्तपासणीची पुन्हा एकदा गरज असल्याचे ते म्हणाले. बहुसंख्याक आणि अल्पसंख्याकासाठी असणाऱ्या कायद्यात फरक आहे तसेच बहुसंख्याकांना अल्पसंख्याकांच्या तुलनेत कमी स्वातंत्र्य असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे.