अधिकारी ऐकत नसतील तर बांबूचे फटके मारा; केंद्रीय मंत्र्याचा अफलातून सल्ला

Giriraj singh

दिल्ली : भडक बोलणाऱ्या नेत्यांमधील एक केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह (Giriraj Singh) यांनी लोकांना, तक्रारी न ऐकणाऱ्या अधिकाऱ्यांना बांबूचे फटके मारा! असा सल्ला दिला.

गिरिराज सिंह त्यांच्या बेगूसराय मतदारसंघात सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना म्हणालेत की, तुमच्या समस्येबद्दल संवेदनहीन असलेल्या अधिकाऱ्यांना बांबूचे फटके मारा.

सरकारी अधिकारी वारंवार लोकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असतात. सामान्य नागरिकांकडून अशा तक्रारी वारंवार त्यांच्याकडे केल्या जातात, यावर ते बोलत होते. गिरिराज म्हणाले की, “यानेही समस्या सुटल्या नाहीत तर मी तुमच्या पाठीशी उभा राहीन!”

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER