परिस्थिती सुधारली नाही तर कडक निर्बंध लावावे लागतील ; छगन भुजबळांचा नाशिककरांना इशारा

Chhagan Bhujbal

नाशिक :- राज्यात कोरोनाचे संकट वाढतच चालले आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा (Corona) संसर्ग आणि रुग्णसंख्या वाढताना पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आढावा बैठक घेतली. नाशिक जिल्ह्यातील परिस्थिती सुधारली नाही तर कडक निर्बंध लावावे लागतील, असा इशारा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी या बैठकीत दिला आहे.

दिवाळीनंतर वाढत गेलेल्या रुग्णसंख्येमुळं नाशिक जिल्हा प्रशासन चिंतेत आहे. व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान आहे .

नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पोस्ट कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. शहरातील बिटको रुग्णालयातही पोस्ट कोविड सेंटरची उभारणी केली जाणार आहे, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER