महापालिका निवडणुका वेळेत घ्या, अन्यथा शिवसेनेची चारीमुंड्या चीत करू; भाजप नेत्याचा दावा

Ashish Shelar & Shivsena

ठाणे : सध्या महापालिका निवडणुका लांबणीवर टाकण्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) पुन्हा निशाणा साधला आहे. निवडणुका वेळेवर जाहीर करण्याचे धारिष्ट्य शिवसेनेने दाखवावे. आम्ही त्यांना चारीमुंड्या चीत केल्याशिवाय राहणार नाही, असा दावा आशिष शेलार यांनी केला आहे.

यावेळी आशिष शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हा दावा केला. महापालिका निवडणुका वेळेवर जाहीर करण्याचे धारिष्ट्य शिवसेनेने दाखवावे. मुदत संपल्यानंतर निवडणूक पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. म्हणजे शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कोरोना काळ बघून वेळेवर निवडणुका घ्यावीत, अशी शिवसेना आणि निवडणूक आयोगाला विनंती आहे. निवडणुका वेळेत न झाल्यास शिवसेनेला चारीमुंड्या चीत करण्याची भाजपची तयारी आहे, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

स्पष्टीकरण द्यावे
राजकारणात प्रत्येकाला मते मांडण्याचा अधिकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वर्धापन दिनानिमित्त शरद पवारांनी (Sharad Pawar) भाष्य केले. त्यांचे भाषण मी ऐकले नाही. या कार्यक्रमात पवार स्वत:च्या पक्षाबद्दल कमी बोलले. शिवसेना शब्द पाळणारा, विश्वास असणारा पक्ष आहे. त्यांनी इतर पक्षाची एवढी स्तुती का केली? याची स्पष्टोती राष्ट्रवादीनेच द्यावी, असेही शेलार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button