आठवड्याभरात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही तर; भाजपाचा राज्यसरकारला इशारा

CM Thackeray-Praveen Darekar

मुंबई :  भारताचा पोशिंदा शेतकरी वर्ग नेहमीच उपेक्षित राहिला आहे. शेतक-यांचे सर्वस्वी गणित अस्मानी कृपेवर व राज्यसरकारच्या धोरणांवर अवलंबून असते. कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ शेतक-यांच्या वाटेला येतोच. त्यातच कोरोनाने यंदा देशाला वेगळ्याच संकटात टाकले आहे. मात्र, असे असतानाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्येही शेतकरी (Farmers) शेतात राबला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाने (BJP) राज्य सरकारवर निशाणा साधत घरात किंवा मंत्रालयात बसून बैठका घेणाऱ्यांना शेतक-यांचे दुःख कळणार नाही असा टोला लगावला आहे. तसेच, ‘अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे येत्या आठवड्याभरात जर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही तर भाजपा टोकाची भूमिका घेऊन सरकार विरोधात संघर्ष करेल,’ असा इशारा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen darekar) यांनी दिला आहे.

प्रवीण दरेकर सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. तिथेच आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली. दरेकर म्हणाले, ‘राज्यातील सत्ताधारी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा द्कायायला हवा होता. राज्याचे सत्ताधारी म्हणून त्यांचे हे काम आहे. अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करुन त्यांच्या खात्यात पैसे जमा करायला पाहिजे होते. पण आता सप्टेंबर महिना संपला तरी एक दमडीही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. झोपलेल्या सरकारला जाग करण्याचं काम आम्ही करणार आहोत.

‘फडणवीस सरकारने गेल्यावर्षी कोकण, कोल्हापुरातील महापुरात झालेल्या नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना हेक्टरी मदत दिली होती. घराच्या पडझडीसाठी, जनावरांना मदत देण्यासाठी स्वतंत्र GR काढून मदत दिली होती. मराठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे, अहवाल देण्यात वेळ घालवण्यापेक्षा किमान या GR नुसार तरी मदत करावी,’ असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

‘आघाडी सरकारचे मंत्री घरात किंवा मंत्रालयात बसून बैठका घेत आहेत. पण घरात बसून त्यांना काहीच कळणार नाही. शेतीच्या नुकसानीमुळे शेतकरी आत्महत्या करण्याचा मानसिकतेत आहेत. त्यांना धीर आणि दिलासा देण्यासाठी शासनाने पावले उचलावीत. जी काही मदत द्यायची ती वेळेत द्यावी. आता रब्बीची पेरणी तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी उभारणी मिळेल,’ असे दरेकर म्हणाले.

ही बातमी पण वाचा : मराठी माणसाच्या वाटेला गेले त्यांचे वाटोळे होते, हे हरामखोरांनी हेसमजून घ्यावे – शिवसेना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER