कोरोनाच्या काळात मंत्री बंगल्यांवर राहिलेच नाही तर विजेचे बिल येणार कसे ? – छगन भुजबळ

मुंबई : कोरोनाच्या (Corona) काळात, म्हणजे गेल्या चार – पाच महिन्यात १५ मंत्र्यांना विजेची बिल पाठवण्यात आली नाहीत, असे माहितीच्या अधिकारात लक्षात आले आहे. यावर प्रतिक्रिया देतांना मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले की, या काळात मंत्री बंगल्यांवर राहिलेच नाही तर त्यांना विजेचे बिल येणार कसे ?

मंत्रांना बंगल्याचे वाटप झाले आणि लगेच कोरोनाची साथ आली. अनेक मंत्री त्यांना मिळालेल्या बंगल्यात राहायलाच गेले नसतील, असे भुजबळ यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, लॉकडाऊनचा आधार घेऊन मंत्र्यांच्या बंगल्यांना वीज बिलाच्या आकारणीतून वगळण्यात आले, असे कळते. आयटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. त्यांनी मागणी केली आहे की, याची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा.

भारतीय जनता पार्टीचे (BJP) नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यावर प्रतिक्रिया देतांना म्हणाले की, लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात सामान्य जनतेला भरमसाठ रकमेची वीज देयके पाठवणे आणि मंत्र्यांना त्यातून वगळणे हा जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER